बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी बाजीराव आहे, तर माझी मस्तानी कुठंय’; गिरीश बापटांच्या वक्तव्याची एकच चर्चा

पुणे । भाजपचे जेष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेले पहायला मिळतात. परवा पुण्यामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्याच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पुणे-पाबळ या पीएमपी बस सेवा उ्दघाटनाच्या निमित्तानं शनिवारी एका कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या वेळी कार्यक्रमात गिरीश बापट यांच कौतुक करताना अॅड सुरेश पलांडे यांनी म्हणलं की गेल्या 40 वर्षात ज्यांना कोणी हरवू शकले नाही, असे पुण्याचे खरे बाजीराव म्हणजे गिरीश बापट आहेत.

सुरेश पलांडे यांच्या वक्तव्यावर मिश्किल बापट यांनी डोक्याला हातच लावला. ‘मी बाजीराव आहे, तर माझी मस्तानी कुठंय’, असं म्हणत बापटांनी पलांडे यांच्या वक्तव्यावर टिप्पणी केली. बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकहानीमुळे पुणे जसं चर्चेतच आहे. तसं पीएमपी बसमुळे पुन्हा प्रसिध्द झालं आणि हे काम खासदार गिरीश बापटांनी केल्यानं बापटच पुण्याचे बाजीराव आहेत, असंही पलांडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘तुम्ही खरोखरच बाजीराव आहात. पण, तुमच्या मस्तानीबद्दल अजून आम्हाला काहीच माहिती मिळालेली नाही’, असंही यावेळी सुरेश पलांडे यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या

“महाराष्ट्रात पुढचे 25-30 वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही”

हाॅटेलच्या टेरेसवरुन उडी मारत फॅशन माॅडेलचा आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांना व्हिडीओ काॅल करत म्हणाली….

IPL 2022: ‘या’ स्टेडिअमवर रंगणार यंदाचे Playoff चे सामने?

Budget 2022: सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर – रामनाथ कोविंद

Budget 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी – नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More