Top News

ज्यांना 10 वर्ष पुण्यात मेट्रो आणता आली नाही त्यांनी श्रेयासाठी भांडू नये-गिरीश बापट

पुणे |  काँग्रेसने मेट्रोसाठीचा एक खड्डाही खोदला नाही. ज्यांना 10 वर्ष पुण्यात मेट्रो आणता आली नाही त्यांनी श्रेयासाठी भांडू नये, अशी टीका पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेसवर केली आहे.

पुण्यात अंडरग्राउंड मेट्रो करायची की ओव्हरहेड यातच त्यांनी 10 वर्ष घालवली. आम्ही तात्काळ निर्णय घेतला आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन करून पुणे मेट्रोचं कामही सुरू झालं, असं गिरीश बापट म्हणाले.

मेट्रोमुळे कसब्यातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न विरोधक विचारत आहेत. त्यांनी त्याची काळजी करू नये… त्यांनी जरी लोकांना वाऱ्यावर सोडले असले तरी मी त्यांचं पुनर्वसन करणारच आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणारच, असंही गिरीश बापट म्हणाले.

दरम्यान, पुणेकरांचं जीवन सुरक्षित आणि संरक्षित करणं हेच माझं काम आहे, असंही बापट यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-रावसाहेब दानवेंना सर्वात मोठा धक्का; बच्चू कडूंनी घेतला हा निर्णय

-सभेत काळा मोजाही न चालणारे सरकार घाबरले आहे- सुप्रिया सुळे

-मला ‘मुन्नाभाई’ म्हणून हिणवता मात्र तुम्ही तर ‘भाई’ आहात- सुजय विखे

-प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणं वृद्धास पडलं महागात

-प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा जास्त मतांनी डॉ. सुजय विखेंना निवडून द्या- पंकजा मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या