बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजितदादा शरद पवारांचं ऐकत नाहीत हे मला माहित होतं, पण आता…”

पुणे | पुण्यात दोन दिवसापूर्वी सकाळच्या बैठकीत अजित पवार म्हणाले होते गर्दी जमली तर 15 दिवस क्वारंटाईन करेन, आणि नंतर म्हणतात की कार्यकर्ते माझं ऐकत नाहीत. दादा शरद पवारांचं ऐकत नाहीत हे मला माहित होतं. मात्र दादांचं कार्यकर्ते ऐकत नाहीत हे मी पहिल्यांदाच ऐकतोय, असा टोला भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी अजित पवारांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा मी पक्ष मानत नाही. ती एक पश्चिम महाराष्ट्रातील पार्टी आहे. पुणे महापालिकेत दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. महापालिकेत भाजपाचं सत्तेत येणार, असं म्हणत गिरीश बापटांनी अजित पवारांना डिवचलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देखील भाष्य केलं आहे.

भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वावर होती. ती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. कारण मला असं वाटतंय ही सर्वांच्या मनातील बोलकी प्रतिक्रिया आहे. प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातील बोलले आहेत. भविष्यात युती होऊ शकते, असं गिरीश बापट म्हणालेत.

राजकीय जीवनात अशा गोष्टी घडत असतात. भाजपने याआधीही सांगितलं होतं, तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. पण भविष्यात अशी युती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असं गिरीश बापट म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

दिल्लीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात पुन्हा भेट; चर्चांना उधाण

“सत्ता गेल्याने त्यांच्या पोटात दुखतंय, पण कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार”

पुन्हा युती होऊ शकते, प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातलं बोलले- गिरीश बापट

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- विजय वडेट्टीवार

“मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More