पुणे महाराष्ट्र

“पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडकरांनी केलाय”

पुणे | पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडकरांनी केला आहे, असं म्हणत भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीत मावळ मतादारसंघाने पवार घराण्याला जो दणका दिला तो सर्वात महत्वाचा होता, असं म्हणत गिरीष बापट यांनी पवार कुटुबियांना लक्ष केलं आहे.

पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता येईल पण पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येणार नाही, असं सर्वांना वाटत होतं. पिंपरी महापालिकेत भाजप जिंकल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मी मी म्हणणारे तोंडात बोट घालून घरी बसले आहेत, असं गिरीष बापट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड मध्ये मान्यवर खूप आहेत. कारण त्यांना मानणार वर्ग मोठा आहे, असं गिरीष बापट म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-खैरेंना धूळ चारलेल्या जलीलांनी उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

-जागावाटपावरून सेना-भाजपात धुसफूस; त्यात आता आठवले म्हणतात मला ‘एवढ्या’ जागा दया

-पक्षाच्या वर्धापनदिनी रोहित पवार म्हणतात, भाकरीच नाही तर पीठसुद्धा बदलायची गरज…

-ना मी मोदींकडे गेलो ना शहांकडे… तरी मला मंत्रीपद मिळालं- रामदास आठवले

-वायनाडच्या 40 टक्के मुसलमानांनी राहुल गांधींना विजयी केलंय- असदुद्धीन ओवैसी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या