पुणे | कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला त्यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. काल आणि आज अर्थमंत्री सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन या पॅकेजबाबत सविस्तर माहिती दिली. तसंच या दोन पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आहे.
आत्मनिर्भर भारत’ पॅकेजच्या दुसऱ्या टप्यात आज स्थलांतरित मजूर, छोटे शेतकरी, तसेच फेरीवाले यांना केंद्रस्थानी ठेवून मोठी मदत घोषित करण्यात आली. आज पुन्हा एकदा ‘मोदी सरकार’ गरिबांसाठी समर्पित आहे हे अधोरेखित झालं आहे, अशी भावना त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा केला जाईल. तसेच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही धान्य मिळणार आहे. प्रति महिना 5 किलो धान्य गरीबांना दिलं जाणार आहे, असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. तसंच फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकार 5 हजार कोटींची मदत करणार आहे. महिन्याभरात फेरीवाल्यांसाठी खास योजना अंमलात आणली जाईल, असं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
देशभरातील 3 कोटी शेतकऱ्यांकडे 4.22 लाख कोटींचं कर्ज आहे, त्यांनी पुढचे 6 महिने कर्जाची परतफेड केली नाही तरी चालणार आहे. तसेच कृषी क्षेत्रासाठी एकूण 86,600 कोटी रुपयांचं कर्ज देण्याची योजना असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.
‘ आत्मनिर्भर भारत’ पॅकेजच्या दुसऱ्या टप्यात आज स्थलांतरित मजूर, छोटे शेतकरी, तसेच फेरीवाले यांना केंद्रस्थानी ठेवून मोठी मदत घोषित करण्यात आली. आज पुन्हा एकदा ‘मोदी सरकार’ गरिबांसाठी समर्पित आहे, हे अधोरेखित झाले.@nsitharaman @PMOIndia
— Girish Bapat (@MinGirishBapat) May 14, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
PM केअर फंडामधून तब्बल ‘एवढ्या’ कोटींचं वाटप तर व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी 2000 कोटी- PMO कार्यालय
महत्वाच्या बातम्या-
६ ते १८ लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना मोठा फायदा; सरकारची नवी घोषणा
‘रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला’; आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका
शंभूराजांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली याचा मनोमन आनंद- जयंत पाटील
Comments are closed.