पुणे | भाजपने लोकांना दिलेला विकासाचा शब्द पाळला असल्याने पुण्यात भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार, असं भाजप खासदार गिरीश बापट यांनी म्हटलंय.
पुणे शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत त्यांच्याकडून विविध विकासकामांची, उभा राहिलेल्या प्रकल्पांची तसंच अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रकल्पांची माहिती बापट यांनी घेतली. यावेळी गिरीश बापट बोलत होते.
संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आलं. पुण्यातही कोरोनाने रौद्र रुप धारण केलं होतं. पण अशाही परिस्थितीत पुण्याचे महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या संपूर्ण नगरसेवकांच्या टीमने अतिशय उत्तम काम केलं, असं बापट यांनी सांगितलं.
पुणेकरांची काळजी घेणारा महापौर लाभला, अशी स्तुती बापट यांनी केली. भाजपच्या नगरसेवकांनी गेल्या काही वर्षात मोठं सामाजिक काम केलंय, असंही बापट म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…’; कविता करत रामदास आठवलेंचा सरकारला टोला
…तर मी फासावर जायला तयार; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी ‘त्या’ युवतीचे आरोप फेटाळले!
”नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या”
विरोधी पक्षाला 15-20 वर्षांनी आशीर्वाद मिळावा- सतेज पाटील
“नारायण राणेंना भाजपत कोण विचारतंय?, राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”