बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो, एकनाथ खडसेंच्या व्हायरल क्लिपने खळबळ

जळगाव |  काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात ठिणगी पाडणारी एक ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासंदर्भातील क्लिप ही जळगाव लाईव्हने सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुकचा एक तरुण पाणी नसल्याने एकनाथ खडसे यांना फोन करून तक्रार करत असतो. त्यावर एकनाथ खडसे उत्तर देतात की, ‘जामनेरचा आमदार कुठे मेला?’ वडगाव बुद्रुकच्या त्या तरुणाच्या अडचणीला उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांबद्दल बोलताना म्हटलं आहे की, “जामनेरचा आमदार गिरीश काय करतोय तिकडे बायका मागे फिरतोय का नुसता!” त्यावर आमदार साहेब फोन उचलत नसल्याचं तो मुलगा सांगतो.

त्या मुलाने आमदार साहेब फोन उचलत नसल्याचे सांगितल्यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन फक्त पोरींचे फोन उचलतात, अशा प्रकारचा टोला लगावला आहे. एकनाथ खडसे यांची ही क्लिप जळगाव लाईव्हने वायरल केल्यानंतर सोशल मीडियावर या क्लिप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. मात्र यानंतर गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे असा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

 

ऐका पुर्ण ऑडीओ क्लिप – 

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं कोरोनामुळे निधन

पुण्यात थेट फेसबुकवरून दारूची विक्री; सापळा रचून आरोपीला अटक

आसाम हादरले! 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

चिंता वाढली! देशात कोरोना मृ्तांची संख्या 2 लाख पार; रूग्णांसह मृत्युदरही वाढला

‘मोदीजी कृपया राजीनामा द्या…’; कंगणाचं ते ट्विट चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More