सांगली | सांगलीतल्या ब्रह्मनाळमध्ये बो़ट उलटून घडलेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गाफील राहिलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर 3 दिवसात कारवाई करण्यात येईल, असं राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
कमी कालावधीत जास्त पाऊस पडला. त्यामुळे कुणालाच पावसाचा अंदाज आला नाही, परंतू मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार याला जे कोणी जबाबदार आहे, त्यांच्या चौकशीचा अहवाल 3 दिवसात येईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असंही महाजनांनी म्हटलं आहे.
पूरग्रस्तांना सरकारकडून मोठया व्यक्तींसाठी 60 रूपये तर लहानांना 45 रूपये तर प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, गणेश मंडळांनी या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून पूरग्रस्तांना मदत करावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
महत्वाच्या बातम्या-
-राज ठाकरेंच्या वक्तव्याशी नारायण राणे सहमत?; म्हणतात…
-ज्यांनी किल्लारी उभं केलं त्या प्रवीण परदेशींकडे सांगलीची जबाबदारी!
-‘हो… अगोदरच विसर्ग केला असता तर होत्याच नव्हतं झालं नसतं’; अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा
-निनावी पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ!
-“सरकारने हेलिकाॅप्टर पूरग्रस्तांसाठी नाही तर मंत्र्यांना फिरण्यासाठी वापरलं”
Comments are closed.