मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये भाजप नेते गिरीश महाजन फक्त पोरींचे फोन उचलतात, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय. याला गिरीश महाजनांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
मी खडसे यांना दोष देणार नाही. वाढतं वय, एवढे आजार आणि त्यामध्ये जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता त्याला बिचाऱ्याला आमदारकीपण मिळत नाहीय. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं, अशी बोचरी टीका महाजनांनी खडसेंवर केलीये.
लोकांना आणि सगळ्यांना कोण काय आणि कोण काय नाही ते माहिती आहे. पण खूप वेगळ्या मनस्थितीत ते सध्या आहेत, असं म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी मग मग तुमचा आमदार गिरीश मेला का?, असं वक्तव्य केलं. त्यावर गावकऱ्याने गिरीश महाजन हे आपला फोन उचलत नसल्याचं सांगितलं. तेव्हा एकनाथ खडसे यांनी, तो फक्त पोरींचेच फोन उचलतो, असं म्हटलं.
थोडक्यात बातम्या-
“केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत”
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं मोठं; 400 किमी अंतराहून येऊन मुस्लिम मित्राने दिली मुखाग्नी
आठ महिन्यांच्या गर्भवतीची हत्या, अत्यंत धक्कादायक घटनाक्रम आला समोर
#सकारात्मक_बातमी | सुरुवातीला बेड मिळेना, 2 दिवस वाहनातच, आज्जीची अखेर कोरोनावर मात
आईचा मृतदेह नेण्यासाठी मिळाली नाही ॲम्बुलन्स, स्मशानापर्यंतचा प्रवास सुन्न करणारा
Comments are closed.