महाजनांना लागली विधानसभा तारखांची कुणकुण; म्हणतात ‘या’ तारखेला होणार निवडणूक

नाशिक | जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणुका होतील, असं भाकीत वर्तवलं आहे. त्याच बरोबर 10 ते 15 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

2014 च्या निवडणुकीच्या तारखेवरून हा अंदाज वर्तवल्याचं महाजनांनी सांगितलं आहे. नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्याक्ष बाळासाहेब थोरातंना शुभेच्छाही दिल्या.

विरोधी पक्ष नेत्यांपासून अनेक दिग्गज नेते भाजपत आले आहेत. आघाडीत पहिल्या बाकावरचे नेते सोडता त्यांच्या मागे उभं रहायलाही कुणी तयार नाही. पहिल्या फळीतलेही बरेच नेते भाजपत यायला उत्सुक आहेत, असंही महाजन म्हणालेत.

दरम्यान, आगामी निवडणुकीत भाजपच सत्ता स्थापन करेल, असंही महाजनांनी म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-युवराज म्हणतो, संघात माझी जागा अजूनही कोणाला घेता आली नाही!

धोनीच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात…

-आजीबाईने मारली बुमराहची स्टाईल; त्यावर तो म्हणतो…

-काँग्रेसची साडेसाती संपता संपेना; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

-विधानसभेबाबत एमआयएमने उचललं मोठं पाऊल

Loading...