मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते तसंच माजी मंत्री यांनी कोरोनाविरोधातल्या लढाईत खारीचा वाटा उचलला आहे. पंतप्रधान केअर फंडात त्यांनी आपला मदतनिधी जमा केला आहे. माझा देश हीच माझी ओळख असं म्हणत त्यांनी आपण मदतनिधी दिल्याचं ट्विटरद्वारे सांगितलं आहे. तसंच इतरही भाजप नेत्यांना त्यांनी पीएम केअर फंडात मदत करावी म्हणून आवाहन केलं आहे.
सगळं जग त्याचबरोबर भारत कोरोना विषाणूचा सामना करतो आहे. या कठीण काळात अर्थव्यवस्थेवर देखील ताण आहे. पंतप्रधान मोदींनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक क्षेत्रातल्या व्यक्तींनी पंतप्रधान केअर फंडात आपला मदतनिधी जमा केला आहे.
दुसरीकडे देशात सगळ्यात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. तसंच महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सर्वाधिक रूग्ण आहेत. महाराष्ट्राला देखील मदतीची गरज आहे. अशाही परिस्थितीत महाजन यांनी राज्याला मदत न देता पंतप्रधान निधीत मदत जमा केल्याने त्यांच्यावर आता टीका होत आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता पंतप्रधान केअर फंडात आपला मदतनिधी जमा केला आहे. त्याविरोधात नेटकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
माझा देश हीच माझी ओळख आहे व आज
माझ्या देशाला माझी गरज आहे. देशाच्या कोरोना विरूध्द लढतीत,मी माझा खारीचा वाटा समर्पित करीत आहे.आपणही #PMCARE फंडमध्ये आपला खारीचा वाटा समर्पित करून हे चॅलेंज स्विकारावे व आपल्या मित्र मैत्रिणींना नॅामिनेट करावे.#IndiaNeedsUs#MyContribution2Nation pic.twitter.com/eXtb1jBeOp— Girish Mahajan (@girishdmahajan) April 18, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
राज्यातील मजुरांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
कोरोनाशी लढा देणाऱ्यांसाठी 45 खोल्यांचं हॉटेल खुलं; शिवसेना नगरसेवकाचा निर्णय
महत्वाच्या बातम्या-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीने आणि जावयाने तोडलं लॉकडाऊन; पदावरून हटवण्याची होतीये मागणी
पुण्यातला कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘त्रिसूत्री’!
Comments are closed.