महाराष्ट्र मुंबई

अमोल कोल्हे आल्याने महाराष्ट्र बदलणार नाही; महाजनांची बोचरी टीका

मुंबई | अमोल कोल्हे आल्याने महाराष्ट्र बदलणार नाही, असं म्हणत जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसने जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘शिवस्वराज्य’ यात्रेचं आयोजन केलं असून ‘शिवस्वराज्य’ यात्रेची धुरा खासदार अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. यावरच एका मुलाखतीमध्ये बोलताना महाजनांनी यावर भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादीच्या सध्याच्या परिस्थितीला अंतर्गत कलह जबाबदार आहेत, अशा शब्दात महाजनांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, शरद पवारांनी नेत्यांना नाराज केलं म्हणून ते आमच्याकडे आले आहेत, असं गिरीश महाजनांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-संधीसाधू लोकांनी भरलेलं भाजपचं जहाज एकदिवशी नक्की बुडणार- अशोक चव्हाण

-पायल रोहतगी पुन्हा बरळली; म्हणते…

-तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणतात…

-राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या!

-‘या’ चार आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या