Top News जळगाव महाराष्ट्र

“खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला, शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं पाहिजे”

जळगाव | भोसरी येथील वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहाप्रकरणी सक्तवसुली संचलनायाने काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांचा चौकशीचे समन्स बजावले होते. मात्र या चौकशीपूर्वीच एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी आणखी मुदत मागून घेतली होती. यावर भाजप नेते गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संपूर्ण राज्यात कोरोना आहे. पण आमच्या जळगाव जिल्ह्यात वेगळ्याच प्रकाराच कोरोनाचा विषाणू आढळून आला आहे. एका व्यक्तीला तीन-तीन वेळा त्याची लागण होत आहे, असं म्हणत महाजनांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.

एका व्यक्तीला तीन-तीन वेळा त्याची लागण होत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोनाची लागण झाली आहे. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे, याची चौकशी करावी असे मी म्हणणार नाही. पण या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे, असं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शासनाने योग्य वेळी काही निर्बंध घातले असते तर ही वेळ आलीच नसती. पण अजूनही वेळ गेलेली नाही. अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आताही कडक निर्बंध घातले नाही तर परिस्थिती चिघळेल की काय, अशी शक्यता आहे. त्यामुळे जनतेनेही स्वत:ची आणि स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन गिरीष महाजनांनी केलं.

थोडक्यात बातम्या-

तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर…- गुलाबराव पाटील

सावधान!! कोरोनासंदर्भात अफवा पसरवाल तर… प्रशासनानं नागरिकांना दिला इशारा!

मंत्रिपद हे मिरवण्याची गोष्ट नाही तर…- दत्तात्रय भरणे

लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण!

…तर मी माझी खासदारकी फेकून देतो- खासदार संभाजीराजे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या