आण्णा, तुम्ही जरा आराम करा, तुमची तब्येत बरी दिसत नाही!

धुळे | भाजप आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यात केलेली बंडखोरी भाजपने मोडून काढली आहे. त्यांच्या लोकसंग्राम पक्षाचा महापालिका निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणी अनिल गोटेंना टोला लगावला आहे. अनिल गोटे यांनी जरा आराम करावा, त्यांची तब्येत बरी दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

अनिल गोटेंनी ज्या प्रकारची भाषा निवडणुकीच्या काळात वापरली, व्हॉटसअॅप आणि फेसबूक अशा सोशल मीडियावर ही भाषा वापरली, ती धुळेकरांना मान्य नव्हती, असं ते म्हणाले.

दरम्यान, अण्णांची एकही जागा येणार नव्हती, पण त्यांच्या २ जागा आल्या, त्या आल्या कशा? हा प्रश्न मला आहे. पण त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो’, अशी खोचक टिपण्णीही त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणविराेधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला  

-भाजपला सर्वात मोठा धक्का; केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहंचा राजीनामा

-कोल्हापुरात भाजपला झटका, महापाैरपदी राष्ट्रवादीने मारली बाजी

-अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर,वाचा ताजे कल

-साहेब नोकरी करतोय, राजकारण नाही; स्वाभिमानी DYSPनं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावलं