Top News जळगाव राजकारण

पक्ष सोडण्याची वेळ का आली याचं खडसेंनी आत्मचिंतन करावं; गिरीश महाजनांचा टोला

जळगाव | एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यानंतर राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी खडसे यांना टोला लगावला आहे.

महाजन म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी छळ केल्याने पक्ष सोडल्याचा खडसे म्हणतायत. मात्र हे अत्यंत चुकीचं असून पक्ष सोडण्याची पाळी खडसेंवर का आली याचं आत्मचिंतन त्यांनी करावं, ज्यामुळे नवीन पक्षात ते सुखी राहतील.

“भाजपच्या कोणत्याही नेत्याबाबत होणारा निर्णय हा नेहमी सामूहिक असतो. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं कदाचित खडसेंना सोपं वाटत असेल,” असंही महाजन म्हणालेत.

दरम्यान भाजप सोडताना खडसे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल चढवला होता. ‘मला पक्षातून ढकलून लावलं. महिलेला माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला सांगितला, फडणवीसांनी मला मनस्ताप दिला, असे आरोप त्यांनी केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना लशीच्या निर्मितीसाठी भारताची तयारी सुरु; केंद्राकडून ‘इतक्या’ कोटींची तरतूद

…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यायला लागलं -एकनाथ खडसे

…म्हणून वडिलांच्या पाठोपाठ रोहिणी खडसेही भाजपला ठोकणार रामराम!

“पश्चिम महाराष्ट्रातील पुरावेळी केंद्राकडून 900 कोटीही आले की नाही शंका”

‘जर मला मोदींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर…’; सुब्रमण्यम स्वामींचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या