खडसे दुसऱ्या पक्षात गेले तरी तिथं त्यांचं मन रमणार नाही!

जळगाव | माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्ष मोठा करण्यात त्यांचं योगदान आहे. ते भाजप सोडून जाणार नाहीत, असं राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. 

भाजपमध्ये कुचंबना सुरु असल्याने खडसे काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी भाजपला वेळोवेळी इशारा दिला, नुकतीच त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. 

खडसे दुसऱ्या पक्षात गेले तरी तिथं त्यांचं मन रमणार नाही. त्यांचा एक सहकारी म्हणून मला ही जाणिव आहे. त्यामुळे ते भाजपमध्येच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.