“माझी पत्नी आणि मुलं कधीच लोकसभा, विधानसभा लढणार नाहीत”

मुंबई |  माझी पत्नी आणि मुलं कधीच लोकसभा, विधानसभा लढणार नाहीत, असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे.

महाजन समर्थकांनी गिरीश महाजन यांच्या पत्नीला रावेर लोकसभा लढण्याचा आग्रह धरला आहे. त्यावर गिरीश महाजन यांनी ही भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घराणेशाही पुढे चालू ठेवायची आहे पण आम्हाला मात्र लोकांची कामे करायची आहेत असा चिमटाही त्यांनी विरोधी पक्षाला काढला.

गिरीश महाजन यांनी मॅक्स महाराष्ट्रशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या-

रोहित पवार म्हणतात चालू परिस्थिती म्हणजे, ‘मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना’

पार्थ पवार म्हणतात, माझा पॅटर्न वेगळा… मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो!

सुजय विखेंच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे पाटलांची सांकेतिक भाषा

भाजपला मोठा धक्का, 2 मंत्री आणि 8 विद्यमान आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी!

…आणि टीव्हीवरील चर्चेदरम्यान भाजप-राष्ट्रवादीचे नेते भिडले, पाहा व्हीडिओ