Top News नाशिक

पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत; भाजपच्या संकटमोचकांना विश्वास

जळगाव | मी पंकजा मुंडेंशी बोललो आहे. त्या भाजप सोडणार नाहीत. त्यांच्या पक्षांतराचा विषय आता संपला आहे, असा विश्वास भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. सोबतच12 डिसेंबरला आपण गोपीनाथ गडावर जाणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं. 

पंकजा मुंडेंनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यानंतर पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याने त्या पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्या शिवसेनेत जाणार असल्याचंही बोललं जात होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊतांनी पंकजा मुंडेच काय भाजपचे अनेक नेते संपर्कात असल्याचं म्हटलं आणि पुन्हा चर्चेला उत आला.

पंकजा मुंडे यांनी या वृत्ताचं खंडण करत आपण पक्ष सोडण्याचा प्रश्नचं नाही. रक्तात बंडखोरी नाही. त्यामुळे पक्षांतराच्या बातम्या चुकीच्या असल्याचं पंकजा यांनी म्हटलं. मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा आहे. मी 12 डिसेंबरला मी यावर बोलेन, असंही पंकजा यांनी सांगितलं.

दरम्यान,  पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत. त्या पक्षावर नाराज असण्याचा प्रश्नच नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणि भाजपच्या इतर नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या