जलसंधारण मंत्री गिरीश महाजनांच्या तोतया पीएला अटक

नाशिक | जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याचं सांगून हॉटेलमध्ये धुडघूस घालणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केलीय. संदीप पाटील असं या व्यक्तीचं नाव आहे.

दारु पिऊन हॉटेल मालकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला समजावून सोडून दिलं होतं. मात्र तो महाजनांचा पीए नसल्याचा समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पोलीस संदीप पाटीलची चौकशी करत आहे. महाजनांचा पीए सांगून त्याने कोणाची फसवणूक केली का? याचा तपास सुरु आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या