बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गिरीश महाजन म्हणाले ईडी आली की कोरोना होतो, आता एकनाथ खडसेंचा पलटवार, म्हणाले…

जळगाव | कोरोनामुळे किती त्रास होतो याची मला जाणीव आहे. त्यामुळेच मी वीस दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. मला अशा प्रकारची नौटंकी जमत नाही. जळगाव महानगरपालिका हातातून गेल्यामुळे गिरीश महाजन यांना चांगलाच झटका बसला आहे. त्यामुळेच त्यांना ईडी वगैरे लक्षात येत आहे, असे बोचरे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना दिले. ते ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

एकनाथ खडसे यांना ‘ईडी’च्या नोटिसा आणि तारखांमुळे कोरोना होतो. पण माझे तसे नाही. मला एकदाच कोरोना झाला. दहा दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. सोमवारी केलेला माझा अहवाल निगेटिव्ह आला. मला कोरोना होतो, तो ‘ईडी’च्या तारखा पाहून होत नाही. सन्मानीय नेते एकनाथ खडसे यांना ‘ईडी’ची तारीख आली की, लगेच कोरोना होतो. अशी बोचरी टीका गिरीश महाजन यांनी केली होती.

एकनाथ खडसे यांनी भाजपला जळगाव महापालिकेत मिळालेल्या अपयशाची आठवण करुन दिली. गिरीश महाजन कोरोनामुक्त झाले त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. मात्र जळगावची महानगरपालिका गिरीश महाजन यांच्या हातातून गेल्यामुळे त्यांना चांगलाच झटका बसला आहे. कदाचित त्यामुळे त्यांना ईडी वगैरे लक्षात येत आहे, असा टोला खडसे यांनी लगावला.

दरम्यान, गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. तरुण नेते म्हणून ते परिचित आहेत. गिरीश महाजन यांना झालेला कोरोना खरा आहे की, जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याचा हा कोरोना आहे. याचा तपास केला पाहिजे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वामध्ये गर्विष्ठपणा आहे. नगरसेवकांना तुच्छ लेखणे, स्थानिक मागण्यांकडे दुर्लक्ष करणे हे होत होते, अशी टीकाही एकनाथ खडसेंनी केली होती.

थोडक्यात बातम्या –

इंदोरीकरांनी मुला-मुलीच्या जन्माबाबत केलेल्या वक्तव्यावर न्यायालयाने 8 महिन्यांनी दिला ‘हा’ मोठा निकाल

…म्हणून पून्हा शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

‘ईडी’च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही- गिरीश महाजन

‘…तर रात्रीचे नियम सकाळी लावावे लागतीत’; मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याचा जनतेला इशारा

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला झाली कोरोनाची लागण, ट्विट करुन दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More