Loading...

“आम्ही दोघं कायमच एकमेकांची पाठराखण करतो”

जळगाव | एकनाथ खडसेंनी सेल्फी प्रकरणात माझी बाजू घेतली. ही चांगली बाब आहे. आम्ही दोघं कायमच एकमेकांची पाठराखण करतो, असं राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

सांगली-कोल्हापूरच्या पूरस्थितीची पाहणी करतानाचा गिरीश महाजनांचा सेल्फी व्हायरल झाला होता. त्यांच्या या सेल्फीवर सर्वच स्तरातून टीका झाली. भाजपचे नेते एकनाथ खडसेंनी मात्र त्यांची पाठराखण केली.

Loading...

गिरीश महाजनांच्या सेल्फीपेक्षा त्यांच्या चांगल्या कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं खडसेंनी पाचोऱ्याच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं. त्यावर महाजनांनी खडसेंच्या बोलण्याला दुजोरा देत आम्ही कायम एकमेकांची पाठराखण करत असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात घडत असतात. या प्रकरणावर मात्र त्याचं एकमत झाल्याचं पहायला मिळतंय.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या भावाला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

-…म्हणून ‘ते’ मला कधीही गोळ्या घालू शकतात- असदुद्दीन ओवैसी

-पवार म्हणतात… जर असं केलं तर अलमट्टीवर कायमस्वरूपी तोडगा निघेल!

Loading...

-कलम 370 रद्द करण्याला जे विरोध करतात त्यांची यादी बनवा अन्…- नरेंद्र मोदी

-पूरग्रस्त लोकांचं दु:ख पाहून शर्मिला ठाकरेंना रडू कोसळलं…!

Loading...