नाशिक महाराष्ट्र

विधानसभेला ढोल वाजणारच नाही तर फुटणार!- गिरीश महाजन

नाशिक : लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार आहे. विधानसभेत विरोधीपक्षाचा ढोल वाजणार नाही तर फुटणार आहे, असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत गिरीश महाजानांनी ढोलाच्या तालावर ठेका धरला होता. ते सर्व गणेशभक्तांसोबत मिरवणुकीत सहभागी झाले होते.

गिरीश महाजनांनी ढोल वाजवल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच मोठ्या संख्येने विजय मिळवणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.

गणपती बाप्पा आम्हाला प्रसन्न झाला आहे. चांगली कामं करणाऱ्यांच्या मागे बाप्पा नेहमी उभे राहतात. लोकसभेला जो चमत्कार घडला तसाच विधानसभेलाही घडणार आहे. याशिवाय विधानसभेला विरोधीपक्षाचा ढोल वाजणार नाही तर फुटणार आहे, असं महाजन म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या