Top News जळगाव महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी देणंघेणं नाही- गिरीष महाजन

जळगाव | राज्यातील आघाडी सरकारमध्ये एकमत नसून हे सरकार संधीसाधू आहे. त्यांना जनतेशी काही देणंघेणं नाही, असं म्हणत भाजप नेते गिरीष महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली.

वाढीव वीज बिले, ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न तसेच इतर कारणांमुळे महावितरण कंपनीच्या विरोधात भाजपने राज्यव्यापी आंदोलन केलं आहे. जळगावमध्ये महाजन यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

सरकारने सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली होती. त्या बाबतीत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळाले नाही. राज्यातील शेतकरी संकटात असताना या सरकारने कानावर हात ठेवले, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. सत्तेत येण्यापूर्वी यांनी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. पण सरकारची आश्वासनं हवेत विरली असल्याचं गिरीष महाजन म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“सचिनला भारतरत्न देणं चुकीचं, हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान”

श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट!

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण!

‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

‘फासा आम्हीच पलटणार’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या