बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यात भाजपचं सरकार यावं ही गणरायाची इच्छा, बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील”

जळगाव | कोरोनामुळे राज्यात गणपती बाप्पाचं साध्यापणात आगमन झालं आहे. याचाच धागा पकडत भाजपचे आमदार गिरीष महाजन यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. जामनेरमध्ये गिरीष महाजनांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात भाजपचे सरकार यावे ही गणरायाची इच्छा आहे. बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील. महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. राज्यात कुणीही सुखी नाही. त्यामुळे राज्यातील जनतेला हे सरकार लवकर जावं असं वाटतं असल्याचं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.

भाजपची सत्ता यावी असं जनतेला वाटतं आहे आणि गणरायाचीही तिच इच्छा आहे. त्यामुळे आपण त्यांना सरकार बदलण्याचे साकडं घालणार नाही. गणरायाचं आता सरकार बदलण्याची इच्छा पूर्ण करून, राज्यात लवकरच भाजपचं सरकार येईल, असंही गिरीष महाजन म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळ अशी निर्माण झालेली विचित्र परिस्थिती दूर व्हावी. कोरोनाचे संकट कायमचं जावं, सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी लाभावं यासाठी गणरायाला साकडं घातल्याचं गिरीष महाजनांनी सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या- 

औषधांची ड्रोनद्वारे होम डिलव्हरी करणारं देशातील ठरणार ‘हे’ पहिले राज्य!

राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार; अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमाला आले तर…’; नारायण राणेंचा ‘त्या’ वक्तव्यावरून यु-टर्न!

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आगीतून फुफाट्यात! विश्वचषकाच्या तोंडावर राशिद खाननं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

रविंद्र जडेजाच्या घरी रंगला ‘राजकीय सामना’; नणंद भावजय आमने- सामने

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More