बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध, त्यामुळे आरक्षण गेले”

जळगाव | राज्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न चांगलाच पेटलेला दिसत आहे. भाजप खासदार संभाजी राजे भोसलेंनी यावरून राज्य सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टिमेट दिला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात टीका सुरू आहे. अशातच भाजप नेते गिरीष महाजन यांनी यावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महाविकासआघाडीतील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता. त्यामुळेच हे आरक्षण गेलं असल्याचा आरोप गिरीष महाजन यांनी केला आहे. जळगावमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला.

आघाडी सरकार आणि वकील आपली बाजू मांडण्यास कमी पडले. तसेच तीन पक्षाचे सरकार असल्याने त्यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादविवाद आणि मतभिन्नता आहे. मंत्रिमंडळातील जवळपास अर्धे मंत्री या आरक्षणाच्या विरोधात आहेत. ते आरक्षण देऊ नको असे म्हणत आहेत. त्यामुळेच आरक्षण गेल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

दरम्यान,  राज्यात भाजपचे सरकार होते त्यावेळी आम्ही सर्व तांत्रिक बाबी तपासून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयात ही टिकलं आणि दुर्दैवाने आमचे सरकार गेलं आणि महाविकासआघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडू शकले नाही. त्यामुळे आरक्षण गेले, त्यामुळे त्याला भाजप जबाबदार आहे असं म्हणता येणार नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…त्यावेळी संभाजीराजेंनी तोंड का उघडलं नाही?’; बी.जी. कोळसे पाटलांची संभाजीराजेंवर टीका

विवाहीत प्रियकराला घरी बोलावून त्याचीच केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

अरे बापरे! नवरदेवाला हळद लावण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

कुलूप लावलेल्या घरात पत्नीनं पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं पुढे झाला हाय होल्टेज ड्रामा

‘क्या हुवा तेरा वादा…जयंतराव जी’; जयंत पाटलांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ यांचं टीकास्त्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More