बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर राऊतांनाच भूमिका मिळाली असती”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकारण रंगताना दिसत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप (BJP) आणि शिवसेनेतील (Shivsena) वाद आता शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेला भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप आणि भाजप समर्थकांकडून सुरू असणारा प्रकार पाहून दादा कोंडके असते तर त्यांनी नवा सोंगाड्या चित्रपट काढला असता, अशी टीका शिवसेनेने सामनातून केली होती. सेनेच्या टिकेला प्रत्युत्तर देतांना गिरीश महाजनांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर संजय राऊतांनाच भूमिका मिळाली असती, असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या जखमेतून रक्त येत नसून ते टोमॅटो सॉस असल्याची टीका राऊतांनी केली होती. यावरूनही गिरीश महाजनांनी जोरदार टोला लगावला आहे.

दरम्यान, टोमॅटो सॉस होता तर तुम्ही त्याची चव घेतली का? गोड वाटला का?, असा सवाल देखील गिरीश महाजनांनी उपस्थित केला आहे. महाजनांच्या टीकेला संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार हे बघावं लागेल.

थोडक्यात बातम्या-

…तर 123 कोटी लोकांचा रक्तगट बदला -संभाजी भिडे

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचं तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ गंभीर कारण, म्हणाले….

तुरूंगातून बाहेर येताच गुणरत्न सदावर्तेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय अहवालातून ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

कोरोनानंतर बर्ड फ्लूचं सावट; ‘या’ ठिकाणी माणसामध्येही आढळला H3N8 स्ट्रेन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More