बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘केसरकर काय चांगले प्रवक्ते झाले, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही’; सभागृहात अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

मुंबई | अखेर अनेक दिवसांनतर विधानसभेला अध्यक्ष मिळाला आहे. महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. देशातील ते प्रथम तरूण अध्यक्ष ठरले आहेत. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलत असताना अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली

गिरीश महाजनांना जेव्हा कळलं की मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. तेव्हापासून त्यांच रडणं थांबेणा. ते अजूनही बांधलेला फेटा काढत आहेत आणि डोळे पुसत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. इतकं वाईट वाटत आहे की आता काही करू शकत नाही, असं अजित पवार म्हणालेत. या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला, अशी जोरदार टोलेबाजी अजित पवार यांनी केली.

त्याबाजूला बघिलतं असता भाजपचं वाईट वाटत आहे. आमच्यातून तिकडे आमदार मोठ्या पदावर बसले आहेत. आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही. दीपक केसरकर काय चांगले प्रवक्ते झाले आहे, असंही ते पुढे म्हणाले.

तुम्ही जर माझ्या कानात जरी सांगितलं असतं की उद्धव ठाकरेंना सांगा की अडीच वर्ष झाली. मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. तर मीच तुम्हाला तिथे बसवलं असतं काही प्रॉब्लेमच झाला नसता, असा टोलाही एकनाथ शिंदेना अजित पवारांनी लगावला.

थोडक्यात बातम्या

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच; खासदार विनायक राऊतांनी केला खुलासा

“कसाबच्या वेळीसुद्धा एवढी सुरक्षा नव्हती, इतकी भीती कशाची”

मोठी बातमी! शिवसेना विरूद्ध शिंदे गटात वादाची नवी ठिणगी

राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

“देवेंद्र फडणवीस येतील असं वाटलं होत पण अर्धवट येतील असं वाटलं नव्हतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More