Top News पुणे महाराष्ट्र

भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल!

पुणे | जळगाव विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जळगाव येथील असून, ते वकील आहेत. तर ते जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत.

या प्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी मागणीवर ठाम; थंडी-पावसातही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु

मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब!

….म्हणून त्याने भररस्त्यावर गर्लफ्रेंडवर गोळी झाडून नंतर स्वत: आत्महत्या केली; मुंबईतील घटनेने खळबळ

शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर?

कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या