Top News

“भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही”

मुंबई | भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, असा टोला राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांना लगावला.

जळगावमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गिरीश महाजन बोलत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधलाय.

भाजपमधून अनेक मुख्यमंत्री गेले आणि आलेसुद्धा, पण त्याने फरक पडला नाही. त्यामुळे भविष्यातही भाजप पक्ष हा वाढतच जाईल, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.

आजही भाजपच्या ताब्यात राज्यातील 80 टक्के महापालिका आहेत. त्यामुळे आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी कारभार सुरु झाला, असे नव्हे. मुळात भाजप मोठा पक्ष आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणं महाराष्ट्राला शोभत नाही”

“2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता…”

काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!

“देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?”

‘तुम्ही कठीण काळातही भन्नाट काम केलं’; मुंबई पोलिसांचं हायकोर्टाकडून कौतुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या