बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तरूणाला खुलेआम प्रपोज करणं ‘तिला’ पडलं चांगलंच महागात, पाहा व्हिडिओ!

इस्लामाबाद | पाकिस्तानच्या लाहोर विद्यापीठात शिकणाऱ्या तरुण तरुणीला खुलेआम प्रेम व्यक्त केल्याबद्दल विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं आहे. विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणीने आपल्याच वर्ग मित्राला थेट सर्वांसमोर गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन प्रपोज केलं त्या मुलाने हे प्रपोजल स्वीकारत तिला मिठी मारली. या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

विद्यापीठाने त्या दोघांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना कारणे द्या नोटीस बजावली होती. परंतु, त्या दोघांनी या नोटिसला उत्तर न दिल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. एखाद्या रोमँटिक सिनेमात हिरो आपल्या प्रेयसीला गुडघ्यावर बसून प्रपोज करतो आणि तिही त्याला गोड हसून होकार देते असाच काहीसा प्रसंग लाहोर विद्यापीठात घडला. परंतु, इथे चित्र उलट असून मुलीने मुलाला प्रपोज केलं.

लाहोर विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणीने आपल्या वर्ग मित्राला विद्यापीठाच्या परिसरातच गुडघ्यावर बसून गुलाबाचा गुच्छ देऊन प्रपोज केलं त्यानंतर त्या मुलाने खुश होऊन त्या मुलीला मिठी मारली आणि या सर्व प्रकरणाचा इतर विद्यार्थी व्हिडिओ बनवत होते. हे सर्व पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची तोबा गर्दी परिसरात झाली होती. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

विद्यापीठाने केलेल्या कारवाईचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे तसेच सोशल मीडियावर विद्यापीठाविरुद्ध राग व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची मुलगी बख्तावर भुट्टो- झरदारी यांनीही ट्विट करून हा प्रकार निंदनीय असल्याचं व्यक्त होत विद्यापीठाच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडिओ –

थोडक्यात बातम्या – 

पवारसाहेब जाणते राजे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा- प्रसाद लाड

सचिन वाझेंची प्रकृती खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खलबतं; ‘या’ बड्या नेत्याचं मंत्रिपद जाणार?

प्री-माॅन्सून सिझनला सुरवात; ‘या’ राज्यात पावसाची शक्यता

महापौर निवडणुकीआधीच जळगाव महानगरपालिकेमध्ये राजकीय भूकंप?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More