बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रस्त्यात छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला तिने बेशुद्ध होईपर्यंत धू-धू धुतलं!

चंदीगढ | रस्त्यावर मुलींची छेड काढणारे टवाळखोर आपण आपल्या आजुबाजुला पाहीले असतील. अशाच एका टवाळखोर मुलाला मुलीची छेड काढणं चांगलंच महागात पडलं आहे. त्या मुलाने आपली छेड काढल्यानंतर संबंधित तरूणीने त्या मुलाला एवढा चोप दिला कि, तो बेशुद्ध झाला.

मारहाण केल्यानंतर त्या तरूणीने आपल्या भावाला फोन करून झालेला प्रकार सांगितला. एका वृत्तवाहीनीने दिलेल्या बातमीनुसार पंजाबच्या पटियालामधील राजपुरा कॉलनीमधून क्लासवरून घरी चालत जाणाऱ्या मुलीला एका मुलाने रस्त्यात अडवून मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत छेड काढण्याचा प्रयत्न केला.

तरूण तिच्याकडे एकटक पाहत होता पण सुरूवातीला तिने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र काही वेळाने त्याने जवळ येऊन रस्ता अडवत मला तुझ्याशी बोलायचं आहे. असे म्हटल्यानंतर तिने त्याला बेदम मारहाण करायला सुरूवात केली. त्याला झालेल्या मारहाणीत तो तरूण चक्क बेशुद्ध झाला. संबंधित तरूणीच्या भावाने तिला स्वरक्षणाचे धडे दिले आहेत. त्यामुळे तिने सर्वात आधी झालेला प्रकार आपल्या भावाला सांगितला.

या सर्व प्रकरणानंतर मुलीच्या भावाने आणि कुटुंबियानी सदरील मुलाला आपल्या मुलीने शिक्षा दिली आहे. तरी त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असं पत्र दिलं आहे. या प्रकरणी बोलताना त्या मुलीने सांगितलं कि, जर मी त्याचा प्रतिकार केला नसता तर त्याची हिंमत आणखी वाढली असती त्यामुळे मी जे केलं त्यानंतर तो आता इथुन पुढे कोणत्याही मुलीची छेड काढणार नाही.

थोडक्यात बातम्या-

तब्बल 500 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘या’ देशाचा दौरा

रूसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी कायपण…; तरूणाने केला ‘हा’ कारनामा

शाहीनबाग आंदोलनाला तापसी, अनुरागने पैसा पुरवला- कंगना रनौत

बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का आहेत?- संजय राऊत

कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलांसोबतचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More