बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात धू-धू धुतलं, पाहा व्हिडिओ

लखनऊ | मेरठमधील एका विद्यार्थिनीने रोड रोडमियाोला भररस्त्यात चोप दिला आहे. या रोड रोमियोंनी विद्यार्थिनीसोबत छेडछाड केल्याची घटना समोर आली होती. यानंतर या विद्यार्थिनीने त्या मुलाला चांगलीच अद्दल घडवली.

विद्यार्थिनी बाजार भागातील रजबन परिसरात राहते. शुक्रवारी ती कॉलेजला जात होती. दरम्यान काही रोड रोमियोंनी तिच्यासोबत छेडछाड केली. पहिल्यांदा तर विद्यार्थिनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर ते तिच्याकडून मोबाइल नंबर मागू लागले. हे तरुण ऐकत मागे जात नसल्याचं लक्षात आल्यानंतर तिचा पारा चढला.

विद्यार्थिनीने भररस्त्यात दोघांची कॉलर पकडून त्यांना चांगलाच चोप दिला. विद्यार्थिनीने भररस्त्यात रोमियोंना चांगलीच अद्दल घडवली. विद्यार्थिनीने तरुणाची धुलाई केली. चांगला चोप दिल्यानंतर तिने तरूणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पोलीसही घटनास्थळी हजर झाली. तेव्हा तर विद्यार्थिनीने पोलिसांची काठी घेऊन तरुणाना मारू लागली. बाजारातील लोकांनी या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”

“लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचं नियोजन करा”

“नरेंद्र मोदी भगवान शंकराचा अवतार आहेत, त्यांनीच देशाला कोरोनापासून वाचवलं”

राज्यात कोरोनाचा उद्रेक; आजची आकडेवारीही अत्यंत धक्कादायक

’21 तारखेला जर परीक्षा झाली नाही तर…’; गोपीचंद पडळकरांंचा राज्य सरकारला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More