मुंबई | अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून येणाऱ्या प्रतिभा पठाडे यांनी 2018 च्या एमपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवत पहिल्याच प्रयत्नात पीएसआयची नोकरी मिळवली आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक होत असून अथक प्रयत्नातून सर्व काही शक्य आहे हे प्रतिभा यांनी सिद्ध केलं आहे.
घरची हालाकीची परिस्थिती असताना अत्यंत मेहनत, जिद्द, चिकाटीने प्रतिभा यांनी अभ्यास केला. पदवी झाल्यानंतर त्यांनी एमपीएससी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पैशाची चणचण असल्याने त्यांनी पार्ट टाईम जाॅब सुरु केला. उरलेल्या वेळात चिकाटीने अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात अवघड असं यश मिळवलं आहे.
प्रतिभा सकाळी 7 वाजता अभ्यासिकेत जायच्या, त्यानंतर दोन तास अभ्यास करुन त्या जाॅबला जायच्या. तीनला जाॅब संपल्यानंतर पुन्हा अभ्यासिकेत जाऊन रात्री उशिरापर्यंच अभ्यास करायच्या. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले आहे. त्यांच्या या यशाने कुटुंबीयांना आकाश ठेंगणे झाले.
दरम्यान, पहिली पोस्टींग म्हणून प्रतिभा यांना गडचिरोलीला पाठवण्यात आले आहे. सध्या प्रतिभा गोंदिया येथे आपले कर्तव्य बजावत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
वॉटरग्रीड प्रकल्पाला फक्त 200 कोटी रुपये देऊन मराठवाड्याची चेष्टा!
अखेर सरपंचाची ग्रामपंचायत सदस्यांमधूनच होणार निवड; राज्यपालांनी केली स्वाक्षरी
महत्वाच्या बातम्या-
राहुल गांधींनी कोरोनाची तपासणी केली; काँग्रेसचं भाजपला उत्तर
अनावधानाने काही वक्तव्य केलं गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो- इंदोरीकर महाराज
मुख्यमंत्रिपद सांभाळणं उद्धव ठाकरेंचं काम नाही; चंद्रकांत पाटलांची विखारी टीका
Comments are closed.