बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मध्यरात्री भररस्त्यात तरूणीने बस थांबवली अन् म्हणते…‘चलो, इश्क लड़ाएं’

पुणे | टिक-टॉक अ‌ॅपची तरूणाईला चांगलीत भूरळ पडली आहे. यामुळे टिक-टॉक व्हीडिओ बनवण्यासाठी कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही. टिक-टॉकवर व्हीडिओ बनवण्यासाठी पुण्यात एका तरूणीने चालू बस थांबवून त्यासमोर डान्स केला आहे. तिचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

पुण्यात गाडीतळ येथील बस स्टँडवर हा व्हीडिओ शुट केला  आहे. या तरूणीने टिक-टॉक व्हीडिओ बनवण्यासाठी चक्क भेकराईला जाणाऱ्या पीएमटी बसला थांबवलं आणि त्यासमोर डान्स केला आहे.

ही तरूणी कोण आहे हे अजून समजू शकलेलं नाही. या तरूणीने ‘बडे मियी छोटे’ या चित्रपटातील ‘चलो इश्क लडाए’ या गाण्यावर भर रस्त्यात डान्स केला आहे.

अचानक बससमोर तरूणी डान्स करायला लागल्याने बस चालकही पहात राहिला. हा प्रकार काल रात्र घडला आहे. यावेळी बसमध्ये प्रवासी देखील होते.

महत्वाच्या बातम्या-

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More