औरंगाबाद | महाराष्ट्रातील लेकींना भाजपच्या लोकांपासून धोका आहे. अन्यथा, महाराष्ट्र आपोआप सुरक्षित होईल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेण्यात आला होता. तेव्हा त्या माध्यमांशी बोलत होत्या.
महिला सुरक्षेवरुन राज्य सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे गृहमंत्रीपद असताना महिला संरक्षणासाठी कोणता कायदा आणला?, असा सवाल करत चाकणकरांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
महिलांबद्दल राम कदम, गिरीश महाजन, गिरीश बापट यांनी अपशब्द वापरले. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहेत. या नेत्यांना फडणवीसांनी सुधारावं, असंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकानिहाय महिला दक्षता समिती स्थापन करणार आहे. समिती पीडितांना पाठबळ देणार आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून लवकरच योजना जाहीर होणार असल्याचंही चाकणकर यांनी यावेळी सांगितलं.
आज औरंगाबाद येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी आढावा बैठक राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय डॉ.फौजियाताई खान यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी मध्ये इतर पक्षातील महिलांनी पक्ष प्रवेश केला.@NCPspeaks @supriya_sule pic.twitter.com/Y9K8eAXnv2
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 29, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
इंदोरीकरांच्या वक्तव्याचं किती भांडवल करणार- सिंधुताई सपकाळ
अमोल कोल्हेंनी ‘तो’ प्रण फेटा बांधून पूर्ण केला
महत्वाच्या बातम्या-
देव देवेंद्र सुबुद्धी देवो आणि अमृताला प्रसिद्धी देवो; किशोर तिवारींची बोचरी टीका
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भगवा घेतलेल्या सचिन अहिरांवर सेनेने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!
“छ. संभाजी महाराजांना स्त्रियांचा आणि दारुचा व्यसनी म्हणणाऱ्या गोळवलकरांचा चंद्रकांत पाटील निषेध
Comments are closed.