लिफ्टमध्ये डोकं अडकल्याने १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

कुलुत जावेरी

मुंबई | लिफ्टमध्ये डोकं अडकल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. मुंबईच्या वांद्रे भागात शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता ही धक्कादायक घटना घडलीय. कुलुत जावेरी असं या मुलीचं नाव आहे. 

कुलुत चौथ्या मजल्यावर लिफ्टची वाट पाहत उभी होती. यावेळी तिने लिफ्टच्या मोकळ्या जागेतून आत डोकावून पाहिलं, त्याचवेळी लिफ्ट आल्यानं तिचं डोकं लिफ्टमध्ये अडकलं. तिला उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.