लाखोंची नोकरी सोडून पोरीने सुरू केली चहाची टपरी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली| देशात बरोजगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. त्यातच कोरोनाच्या काळात काहींच्या हातात असलेल्या नोकऱ्याही गेल्या. त्यामुळं सध्या असंख्य तरूण नोकरीच्या शोधात आहेत. त्यातच दिल्लीतील एका महिलेने हातची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून चहाचं दुकान सुरू केलंय. मात्र तिच्या या निर्णयामुळं सोशल मीडियावर अनेकांनी तिची खिल्ली उडवलीय. तसेच चहाच्या स्टाॅलवरचे तिचे फोटोही चांगलेच व्हायरल होत आहेत. आता ही तरूणी नेमकी कोण आहे आणि तिनं चहाचा स्टाॅल टाकण्याचा निर्णय का घेतला हेच आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.

शर्मिष्ठा घोष. शर्मिष्ठाने दिल्लीतील कॅंटमधील गोपीनाथ बाजार येथे चहाचा स्टाॅल लावला आहे. आता तुम्ही म्हणाल चहाचा स्टाॅल लावला यात काय नवीन किंवा काय वेगळं आहे. पण आम्ही तुम्हाला ही स्टोरी सांगतोय कारण तिनं इंग्लिश लिटरेचर मधून शिक्षण पूर्ण केलय आणि तिनं ब्रिटीश काऊन्सिलमधील नोकरी सोडून चहाचा स्टाॅल लावलाय आणि दुसरं म्हणजे जिद्द, आवड आणि इच्छाशक्तीच शर्मिष्ठा एक उत्तम उदाहरण आहे.

जेव्हा शर्मिष्ठाला विचारण्यात आलं की तू हा निर्णय का घेतला. तेव्हा ती म्हणाली की या चहाच्या स्टाॅलला चायोस एवढं मोठं करायचं आहे. आता चायोस किती मोठं आहे हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. शर्मिष्ठा यांची ही स्टोरी लष्करातील निवृत्त ब्रिगेडीयर संजय खन्ना यांनी सोशल मीडीयावर शेअर केलीये.

आता खन्ना यांनी या स्टोरीत सांगतिल्याप्रमाणे शर्मिष्ठाला चहाचा स्टाॅल टाकायला तिच्या मैत्रीणीनंही साथ दिलीये. विशेष म्हणजे ती सुद्धा एअरलाईन्समध्ये काम करत होती. आता शर्मिष्ठाची स्टोरी वाचून अनेकजण तिच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत. कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं. शर्मिष्ठा आणि भावना राव यांची गोष्ट प्रेरणादायी आहे. त्यांच्या या निर्णयामुळं दिसून येतं की कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर काहीही शक्य आहे, अशा आशयाच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत.

पण म्हणतात ना कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. तसंच आता शर्मिष्ठा यांच्या निर्णयाला विरोधही केला जातोय. तुमच्या शिक्षणाचा वापर तुम्ही शिकवण्यासाठी करू शकता. तुमचं स्वप्न फूड चेन सुरू करणं असेल तर या आधी ग्रॅज्युएशन आणि चांगल्या नोकऱ्या कशासाठी केल्या, असा सवालही उपस्थित केला जातोय. हे एकप्रकारे असंघटीत व्यवसायला प्रोत्साहन दिल्यासारखे आहे आणि हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही, असंही काहींचं म्हणणं आहे. परंतु विरोध असला तरी शर्मिष्ठीचा निर्णय प्रेरणादायी आहे, असं म्हणत अनेकजण तिचं कौतुकही करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-