बलरामपूर | छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यात नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 13 दिवस या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला.
पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांना अटक केली असून त्यापैकी सहाजण अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही मुलगी 20 नोव्हेंबरला मैत्रिणींना भेटायला जाते सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर गांधीनगर परिसरात ती मैत्रिणीसोबत आलेल्या एका तरुणाला भेटली. या तरुणाने पीडित मुलीला आपल्यासोबत येण्यास राजी केलं. त्यानंतर तरुणाने या मुलीवर बलात्कार केला.
या तरुणाने बलात्कार केल्यानंतर या मुलीला सोडून न देता आपल्या मित्रांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर 13 दिवस या मुलीवर सात वेगवेगळ्या जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची माहिती आहे.
अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी सहाजण अल्पवयीन आहेत. पोलिसांनी या सर्वांवर गैरकृत्य आणि पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर दोन सज्ञान आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु आहे.
थोडक्यात बातम्या-
“शिवसेना बाळासाहेबांची शिकवण विसरली, संपूर्ण पक्ष शरद पवारांपुढे लीन झालाय”
दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे- अण्णा हजारे
कृषीमंत्री असताना पवारांनी कृषी कायद्यासंबंधी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर केला खुलासा; म्हणाले…
“कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान की कृषीमंत्री?”
देशातील शेतकरी आंदोलनादरम्यान केरळ सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय