बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक! अज्ञात तरूणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल चोरला

मुंबई | पूजा चव्हाण प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाणच्या बहिणीला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका युवतीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतल्याची माहिती समोर आली. ही घटना परळीतील फाऊंडेशन शाळेजवळ घडली आहे.

पूजाची बहिण दिव्यांगा लहू चव्हाण हिचा मोबाईल चोरण्यात आला आहे. दिव्यांगा ही दहाव्या वर्गात शिकत आहे. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती आणि तिचा मित्र सौरभ कराड हे दोघे परळीतील हनुमान गड परिसरात गेले होते.

दिव्यांगा फोनवर बोलत येत असताना समोरून आलेल्या अनोळख्या तरुणीने अचानक तिच्या हातातून मोबाईल हिसाकवला आणि पळ काढला. सौरभ आणि दिव्यांगाने तिचा पाठलाग केला. पण काही अंतरावरच अनोळखी तरुणी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून फरार झाल्याची माहिती आहे.

घडलेल्या घटनेनंतर दिव्यांगा आणि सौरभ यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अनोळख्या तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती युवती कोण आणि तिने पूजाच्या बहिणीच्या मोबाईल का पळवला? याचा तपास पोलीस करत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्या रात्री तावडे नावाच्या माणसाचा फोन अन्…’; मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिली धक्कादायक माहिती

‘या’ उड्डाणपुलाला शरद पवारांचं नाव द्या; राष्ट्रवादीची मागणी

“वझे बिझे वाजत गेेले, आम्हाला त्यांची भिती दाखवू नका”

मनसुख यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

महाविकास आघाडीतील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More