बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गर्लफ्रेंडनं आपल्याच बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्… अत्यंत धक्कादायक घटनेनं खळबळ

नवी दिल्ली | तायवानमधील एका गर्लफ्रेंडने तिचा बॉयफ्रेंड झोपल्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गर्लफ्रेंडने तिचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत चिट करत असल्याचा आरोप केला होता. त्याला अनेकदा समजावूनही तो सुधारण्याचं नाव घेत नव्हता. अशात त्या गर्लफ्रेंडने तिच्या बॉयफ्रेंडला अतिशय भयानक शिक्षा दिली आहे. ती गर्लफ्रेंड एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने कापलेला प्रायव्हेट पार्ट पुन्हा जोडला जाऊ नये, म्हणून तिने कापलेल्या पार्टचा भाग टॉयलेटमध्ये फ्लश केला.

‘मिरर’ने दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण तायवानमधील चंघुया काउंटीमध्ये असणाऱ्या शिहू टाउनमधील आहे. येथे राहणाऱ्या हुआंग नावाच्या एका व्यक्तीने रात्री अतिशय मद्यप्राशन केलं होतं. त्यानंतर तो बेशुद्ध होऊन झोपला. परंतु सकाळी जेव्हा तो उठला, त्यावेळी अंथरुणावर सर्वत्र रक्त पसरलेलं होतं.

तो रक्त पाहून घाबरला आणि त्यावेळी त्याला प्रायव्हेट पार्टच्या जागी दुखत असल्याची जाणीव झाली. त्यानंतर, आपला प्रायव्हेट पार्ट गायब झाल्याचं त्याला समजलं. काही वेळात त्याला गोष्टी समजल्यानंतर, त्याच्या गर्लफ्रेंडनेच फुंगने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचं कळल्यानंतर तो हैराण झाला.

दरम्यान, हुआंग तिच्यासोबत चिट करत होता. तो दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. अशात तिने हुआंगला अद्दल घडवण्यासाठी हा निर्णय घेतला, असं फुंगने सांगितलं. सध्या फुंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे.

थोडक्यात बातम्या – 

Shree

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात इतक्या रुग्णांची नोंद

“टीव्ही चॅनलवाल्यांनी पश्चिम बंगाल तामिळनाडूतील गर्दीचे शॉट महाराष्ट्रात दाखवत बसू नये”

कोरोनाची परिस्थिती भयंकर, सरकारला सहकार्य करा- देवेंद्र फडणवीस

वाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट राज ठाकरेंना फोन, केली ‘ही’ महत्त्वाची विनंती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More