बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गर्लफ्रेंडचा राग बाॅयफ्रेंडच्या जीवावर बेतला, रागात फेकून मारला फोन अन्…

नवी दिल्ली | रागात माणूस अनेक टोकाचं पाऊल उचलतो. कधी कोणाचा राग कोणाच्यातरी जीवावर बेतला असं अनेकदा ऐकायला मिळतं. मात्र देशात घडलेल्या एका घटनेनं सर्वांना चक्कीत केलं आहे. या घटनेमध्ये गर्लफ्रेंडने जे केलं त्याने सर्वांसाठीच हैराण करणारं होतं

एका 22 वर्षीय तरुणीने 23 वर्षीय बाॅयफ्रेंडला रागात फोन फेकून मारला. दोघांमध्ये वाद सुरु असताना प्रियकर तरुणीला मारहाण करु लागला. त्यामुळे तरुणीने रागात बाॅयफ्रेन्डला फोन फेकून मारला.

काही वेळानंंतर तरुणाचं डोकं दुखू लागल्याने त्याने तिला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेलं. यावेळी त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. तसेच तरुणाचं ऑपरेशन करावं लागणार असल्याचं देखील डाॅक्टरांनी सांगितलं.

दरम्यान, तरुणावर शस्त्रक्रिया चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला. यानंतर तरुणाच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. तपासात तरुणीने फेकलेल्या फोनमुळेच तिच्या प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यामुळे आता तरुणीला तरुंगात जावं लागण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत शेतात काम करु नका’; ‘या’ जिल्ह्याच्या प्रशासनाने दिले आदेश

पुढील पाच दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

“राज्यपालांनी सरकारला त्यांची चुक दाखवून दिली, नाहीतर…”

आई तू इतकी क्रूर कशी झाली?, वारंवार दूध मागितल्याने बाळाला आपटलं; लेकराचा जागीच मृत्यू

मुंबईला चारी मुंड्या चीत केलं तरी कोलकाताच्या कर्णधाराला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More