बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेयसीचा गळा चिरुन खून, हळदीला बसलेल्या तरुणाला अटक, हत्येमागचं धक्कादायक कारण आलं समोर

नवी दिल्ली | मध्यप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरुन तिचा खून केला. तिचा खून केल्यानंतर नवरदेव म्हणून हळदीसाठी बसलेल्या आरोपीला पोलिसांनी हळदीच्यावेळी अटक केली. आरोपी तरुणाची चौकशी केल्यानंतर गर्लफ्रेंन्डच्या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आलं आहे.

संबंधित घटना ही मध्यप्रदेश येथील शिवपुरी जिल्ह्यातील आहे. आरोपीचं नाव संजय कोरी असं आहे तर मृत झालेल्या त्याच्या प्रेयसीचं नाव लक्ष्मी तोमर असं आहे. संजय याला पोलिसांनी त्याच्या हळदीच्या दिवशी चालू हळदीत अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. यादरम्यान आपली प्रेयसी लक्ष्मीचा घटस्फोट झाला असून ती आपल्यावर लग्न करण्यास दबाव टाकत असल्याचं त्यानं सागितलं आहे.

आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रेयसी जरी त्याच्यावर लग्नाचा दबाव टाकत असली तरी संजयला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. म्हणून संजयने तिला आपण लग्न करु असं सांगून गुना येथे बोलवलं. लक्ष्मी तिथे पोचताच संजयने तिचा गळा चिरुन तिला झाडांमध्ये फेकून दिलं. संबंधित घटना ही 30 एप्रिलला झाली असून संजयचं लग्न 8 मे ला होणार होतं.

दरम्यान, लक्ष्मीचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांना तिची ओळख पटणं कठीण जात होत. या कारणामुळे पोलिसांनी तिचे मृत झालेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर त्यांना तिच्याबाबतची माहिती मिळाली. यानंतर 7 मे ला पोलिसांनी आरोपीला त्याच्या लग्नाच्याआधीच अटक केली. या संपुर्ण घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात एका पाठोपाठ एक गुन्हा! बदला घेण्यासाठी रचला फिल्मी कट, पेटवली कार

‘आम्हाला नियुक्त्या द्या, आता आम्ही हताश झालोय’; MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं पत्र व्हायरल

“कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात नरेंद्र मोदी अपयशी आणि हतबल”

महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला खूप चांगल्या पद्धतीनं करतोय- नरेंद्र मोदी

हॉटेलमध्ये घुसली भलीमोठी पाल, महिला वेटरनं केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More