बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जयंतराव, बुजगावण्यांना पुढं करण्यापेक्षा थकलेले 100 कोटी द्या!

सांगली | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बुजगावण्यांना पुढं करून उत्तर देत आहेत. ते करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे उसाच्या एफआरपीचे थकलेले शंभर कोटी रुपये द्या, असं आव्हान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजारामबापूंनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना काढला. त्यांचे सुपुत्र गेली तीस वर्षे या शेतकऱ्यांच्या जिवावर आमदार, मंत्री आहेत. मात्र शेतकऱ्यांना हक्काच्या दामासाठी चातकासारखी वाट पाहावी लागत आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, सर्व स्तरांतून विरोध वाढत असल्याने जयंतरावांचे बगलबच्चे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची कोंडी करत आहेत. असा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजपला मोठा धक्का; भाजपच्या जेष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

-बायकोला उमेदवारी दिली नाही म्हणून भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

-तंबाखू खाणाऱ्या पोलिसाला न्यायालयाची शिक्षा; लावल्या खराब भिंती पुसायला

-2019 मध्ये भाजप जिंकल्यास भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल!

-रामराजेंचे विधानपरिषदेचे सभापती पद धोक्यात?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More