बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘100 रूपये द्या आणि माझ्यासोबत सेल्फी घ्या’; भाजप नेत्याची भन्नाट आयडिया

भोपाळ | केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना पुन्हा आपलं डोकं वर काढू लागला आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसून येत आहे. कोरोनाची संख्या कमी झाली असली तरी सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करण्याची गरज आहे. पण राजकिय किंवा सांस्कृतिक व्यासपिठावर या नियमांचं खुलेआम उल्लंघन होत असतं. त्यात आता भाजपच्या एका नेत्यांनी एक भन्नाट कल्पना शोधली आहे.

आपल्यासोबत कुणालाही सेल्फी काढायची असेल, तर अगोदर पक्षासाठी 100 रुपयांचा निधी जमा करावा लागेल, अशी घोषणा उषा ठाकूर यांनी केली आहे. देशात मोठं आर्थिक संकट आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राजकिय पक्षांकडे निधीची कमतरता आहे. या कल्पनेमुळे पक्षानिधीत तरी भर पडेल. त्याचबरोबर त्याचा पक्षाला आणि देशाला देखील फायदा होईल असं देखील उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे.

उषा ठाकूर कोरोना काळात देखील चर्चेत राहिल्या होत्या. ज्या नागरिकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांनी पीएम केअर फंडात 500 रूपये दान करा, अशा सुचना त्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील झाली होती. आता त्यांनी केलेल्या या कल्पनेची चर्चा मध्यप्रदेशात सर्वत्र सुरू झाली आहे. तर त्याआधी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी त्यांना भर सभेत मास्क घालण्याची सुचना केली होती.

दरम्यान, एखाद्या राजकिय कार्यक्रमात फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी लोक गर्दी करत असतात. त्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचं पालन होत नाही. कार्यक्रम झाल्यानंतर अनेकांना सेल्फी घेण्याची इच्छा असते, त्यामुळे नेत्यांना पुढील कार्यक्रमात जाण्यास उशिर होतो आणि पुढील दिनचर्या बिघडते, त्यामुळे कमीत कमी लोकांनी सेल्फी काढावा आणि वेळ वाया जाऊ नये, असा देखील याचा उद्देश असू शकतो.

थोडक्यात बातम्या-

“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत”

मुसळधार पावसात जखमी बाप-लेकीच्या मदतीला धावले पोलीस, पाहा व्हिडीओ

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’; युवक काँग्रेसचं बोंबाबोंब आंदोलन

अमिताभ बच्चन की सोनू सूद?; फोटो पाहून चाहतेही पडले गोंधळात, पाहा फोटो

“आम्ही दिवा स्वप्न पाहत नाही, आमचं स्वप्न 2024ला पूर्ण करू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More