“शिवसेनेला एक हाक द्या, आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ”

सोलापूर | शिवसेनेला एक हाक द्या, आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ. मी येथे मतांसाठी आलेलो नाही. शिवसेना म्हणजे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. असं  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मोहोळच्या सारोळ गावातील शेतकऱ्यांची भेट घेतली असता, तेव्हा बोलत होते.

शिवसेना फक्त पाण्याची टाकी नाही तर त्यात पाणीही देणार, असं भावनिक आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यावेळी केलं.

त्यांनी सारोळे गावात शिवसेनेच्यावतीने पाण्याची टाकी आणि पशुखाद्य वाटप केले. आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत, असं आश्वासनही त्यांनी गावकऱ्यांना दिलं.

दरम्यान, शेतकरी हा आमचा पोशिंदा आहे. त्यामुळे कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, असं आदित्य ठाकरे यानी लातूर येथे सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या-

-भाजप नेत्याच्या मुलाला जाब विचारला म्हणून केली शिवीगाळ!

सुरेश प्रभू ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

राहुल गांधी विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे दलाल- रविशंकर प्रसाद

…तर भाजपचे ‘हे’ मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

काँग्रेसचे ‘हे’ चार आमदार राजीनामा देणार?

Google+ Linkedin