बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या, लागतील तेवढे रोप-वे, रस्ते, पूल बांधून देईन”

पुणे | ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी गाड्यांचे कर्कश आवाज बदलून त्या जागी वाद्यांचे आवाज असलेले हार्न लवकर येणार आहेत. त्याचबरोबर अॅम्ब्युलन्सच्या सायनरचा आवाज बदलून त्याजागी आकाशवाणीवरील मधूर संगीत असणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील रस्त्यांच्या संदर्भातही नितीन गडकरी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

पुण्यातील सिंहगडरोडवरील एका उड्डाण पुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या, लागतील तेवढे रोप-वे, रस्ते, पुल बांधून देईन, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

भविष्यात रस्त्यांवरून चालताना हार्नच्या कर्कश आवाजाऐवजी वाद्यांचा आवाज ऐकू आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. वाहनांमध्ये मोठ्या आवाजाच्या हार्नऐवजी आता भारतीय वाद्यांचा वापर करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार महत्त्वाचं पाऊलं उचलत आहे, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी काही वर्षापासून भारतात रस्त्यांच्या कामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतूक केलंय.

थोडक्यात बातम्या- 

राज्यात पावसाचा धोका वाढला; ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

स्वाभिमानीचंही एकरकमी FRPसाठी डिजिटल आंदोलन, सहभागी होण्याचं आवाहन

“लोकं सांगतात…एका एकराला 18 कोटी मिळतायेत, दादा तो रस्ता आमच्या वावरातून न्या की”

“श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज!”

“मनसेने कधीही सत्तेसाठी शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More