बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा समाजाला 3 हजार कोटींचं, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचं पॅकेज द्या- भाजप

मुंबई | भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची मुंबईत गुरूवारी बैठक पार पडली. यामध्ये भाजप नेत्यांनी मराठा समाजाला 3 हजार कोटी रुपयांचं, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी केली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे प्रभारी सी. टी. रवी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यकारिणी सदस्य या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

राज्य सरकारने पुन्हा एकदा प्रामाणिक प्रयत्न करून हे आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला विशेष सवलती व 3 हजार कोटीचे आर्थिक पॅकेज द्यावे. या सरकारने पदोन्नती आरक्षणा संदर्भातही संभ्रम निर्माण करून ठेवला आहे. हा संभ्रम लवकरात लवकर दूर करावा तसेच लस खरेदीचे वाचलेले 7 हजार कोटी रुपये बारा बलुतेदार, छोटे व्यवसायिक, शेतकरी, कष्टकरी वर्गाला पॅकेज रूपाने द्यावेत, अशा मागण्या भाजपने केल्यात.

फडणवीस सरकारच्या काळात प्रयत्नांची पराकाष्ठा करून मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून दिलेलं. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं, अशी टीका भाजप नेत्यांकडून करण्यात आली.

थोडक्यात बातम्या- 

“एरव्ही महापौर मोहोळ मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहोचतात, पण…”

‘बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा’; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

‘…तर कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसची गरज नाही’; ICMR च्या रिसर्चमधून महत्वाची माहिती समोर

पावसामुळं गंगेच्या पाणी पातळीत वाढ; किनारी वाळूत दफन केलेले मृतदेह बाहेर

‘भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर…’; आरक्षणावरून नणंद-भावजय आमनेसामने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More