Top News कोरोना

लष्करी जवान आणि माजी सैनिकांनाही प्राधान्याने कोरोनाची लस द्या- बाळा नांदगावकर

मुंबई | कोरोनाची लस आल्यावर ती देण्याबाबत राज्य सरकारने नियोजन केलंय. यामध्ये प्रोटोकॉलनुसार सुरुवातीला डॉक्टर, पोलीस आणि कोरोना सेवकांना ही लस देणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय.

डॉक्टर, पोलिसांसोबत लष्करातील जवान आणि माजी सैनिक तसंच त्यांच्या कुटुंबाचं अग्रक्रमाने लसीकरण करण्यात यावं अशी मागणी आता मनसेकडून केली जातेय.

कोरोनाची लस आल्यानंतर प्रथम श्रेणीत ती लोकप्रतिनिधींनाही देण्यात येण्याची मागणी होतेय. मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, “लष्करी जवान, माजी सैनिक तसंच त्यांच्या परिवाराचाही प्रथम श्रेणीत समावेश करावा. आणि त्यांनाही कोरोनाची लस देण्यात यावी.”

हे सर्वच देशासाठी बलिदान देण्यात अग्रेसर असतात, असंही नांदगावकर यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या”

तुटवडा की छपाई बंद???; आता एटीएममध्ये मिळणार नाहीत ‘या’ नोटा!

“मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रमाणिक भावना”

“बाप तरी दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ही वेळ आली आहे… मराठा आरक्षण दिरंगाईला….”

संजय राऊत लिलावती रूग्णालयात होणार दाखल; अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या