पुणे महाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्या- सुप्रिया सुळे

पुणे | सध्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पीकांचं पावसाने नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्याना आर्थिक मदत मिळावी म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र लिहिलं आहे.

रविवारी झालेला पाऊस आणि वारा यामुळे बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यातील आणि खडकवासला ग्रामीण भागातील ज्वारी, बाजरी व ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

इतर तरकारी आणि डाळिंब पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एकतर शेतीमालाला बाजारभाव नाही. कोरोनाचे संकट, त्यामळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी तसेच फळपिकांचे पिक विमा असलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ही विनंती, असं पत्रात सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वळवाच्या पावसाने कडधान्यालाही मोठा फटका बसला आहे. यामध्ये घेवडा, चवळी, मूग आणि सोयाबीन या कडधान्यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने केला दोन लाखांचा टप्पा पार!

‘त्यासाठी माझा इतिहास पाहा’; पिंपरी-चिंचवडचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुन्हेगारांना ठणकावलं

राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस- चंद्रकांत पाटील

‘जे पेराल तेच उगवेल’; रियाच्या अटकेवर शेखर सुमनची प्रतिक्रिया

तुम्ही कंगणाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही- गीता फोगट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या