देश

‘आधी आमदार-खासदारांना कोरोनाची लस द्या’; हरियाणा सरकारचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र

चंदीगड | लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, सुरक्षा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच आमदार आणि खासदारांनादेखील कोरोनाची लस द्या, अशी विनंती हरियाणा सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला केली आहे. यासंदर्भात
हरियाणा सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठवलं आहे.

आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत. ते सतत लोकांच्या संपर्कात असतात. ते अनेक लोकांना भेटतात. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात त्यांनादेखील कोरोनाची लस देण्यात यावी, असं हरियाणा सरकारने पत्रात म्हटलंय.

लसीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, अशा फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोना लस दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली होती. त्याचबरोबर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

लसीकरण्यासाठी प्रत्येक राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर टास्क फोर्स असणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसच्या डावपेचांचा शोध लावायचो, तेव्हा कळायचं त्यामागे अहमदभाई आहेत”

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं पाणी बील थकीत नाही; मुंबई महापालिकेचा अहवाल

पाऊण तासानंतर Gmail, YouTube सेवा पूर्ववत

आंदोलन की पिझ्झा पार्टी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलजीत दोसांजचं उत्तर, म्हणाला…

…म्हणून मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या